हिवाळा आला आहे आणि आपण विशेषतः अश्या थंड हवामानात बनवलेल्या स्वादिष्ट पदार्थांचा आनंद घेण्यापासून स्वतःला रोखू शकत नाही.
ह्या गार वातावरणात आपण आपल्या आहारात किंवा अवेळी लागणाऱ्या भुकेत काही अरबट-चरबट खात असतो जे आपल्या आरोग्याला चांगला नसत !
थंडीच्या ऋतूचे आगमन सोबत घेऊन येते वेगवेगळे सुपरफूड खाण्याचा आनंद! त्यातील एक म्हणजे गूळ.
थंडीच्या हंगामात तुमचे आरोग्य आणि सौन्दर्य उत्तम ठेवण्यासाठी गूळ आणि गुळापासून तयार केलेले पदार्थ चुकवू नका.
हल्ली बहुतेक पदार्थात साखरेला वगळून त्याजागी गुळाचा वापर केला जातो. पूर्वीच्या काळी थंडीत गूळ हा लहानांपासून ते प्रौढांपर्यंत आवर्जून खाल्ला जात असे.
हल्लीच्या मॉडर्न काळात गुळ हा काहीसा वंचितच राहीला आहे, परंतु गूळ हा सुपरफूड आहे हेही मात्र तेवढाच खरं आहे.
गुळाचे नेमके आरोग्याला काय काय फायदे होतात ते जाणून घेऊ.
गुळामुळे फ्लू सारखी लक्षणे हाताळली जातात, रोगप्रतिकारशक्ती वाढवते.
पचनक्रिया सुधारते. गूळ सांधेदुखीपासून बचाव करण्यास मदत करते रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते.
चयापचय वाढवते आणि वजन कमी करण्यास मदत करते. थंडीत शरीर उबदार ठेवणे महत्वाचे आहे.
तुमच्या लक्षात आले असेल की, याच वेळी बाजारात चिक्की, गोंडाचे लाडू, शेंगदाण्याचे लाडू मिळतात. आश्चर्य का? याचे कारण म्हणजे, या सर्व घटकांमध्ये उबदार तसीर असते आणि ते मानवी शरीरासाठी चांगले मानले जाते, कारण ते तुम्हाला हिवाळ्यातील थंडी आणि संबंधित आजारांपासून सुरक्षित ठेवते.
सर्वात कमी महत्व दिले जाणारे मिश्रण म्हणजे शेंगदाणे आणि गूळ, जे आपण या हंगामात लाडू आणि चिक्कीच्या रूपात नियमितपणे खातो.
शेंगदाण्यामुळे पोटाच्या कर्करोगाचा धोका कमी होतो, त्यात भरपूर ऊर्जा असते.
हे वाईट कोलेस्ट्रॉल कमी करते आणि चांगले कोलेस्ट्रॉल वाढवते.
वजन वाढणे आणि कोलन कर्करोगाचा धोका कमी आहे.
वजन नियंत्रणात मदत होते.
शेंगदाणे हे प्रथिने आणि अमीनो ऍसिडमध्ये समृद्ध असतात जे शरीराच्या सर्वांगीण विकासासाठी चांगले असतात.
हे हृदयरोग, अल्झायमर आणि संसर्गाशी लढते. स्ट्रोकपासून बचाव करते.
अशी हि शेंगदाणे आणि गुळाने समृद्ध सप्रेंची चिक्की जरूर मागवा आणि खाऊन बघा.
पौष्टिक तसेच उत्तम प्रतीच्या गूळ आणि शेंगदाण्यापासून तयार केली जाते..
ऑर्डर करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.