आलं किंवा अद्रक, ह्या नावांनी जे प्रसिद्ध आहे, ते भारतीय स्वयंपाकघरात वापरल्या जाणार्‍या सर्वात महत्त्वाच्या मसाल्यांपैकी एक आहे. 


तीक्ष्ण आणि सुगंधी, हे औषधी गुणधर्मांसाठी देखील आलं मोठ्या प्रमाणावर वापरले जाते.

आता हिवाळा सुरू झाला आहे, तुम्हाला अशा पदार्थांची आवश्यकता असेल जे तुम्हाला उबदार ठवतील आणि तुमची प्रतिकारशक्ती वाढवतील.


अदरक  हे अनेक घरगुती उपचारांसाठी सर्वात प्रमुख पदार्थांपैकी एक असल्याचे सिद्ध झाले आहे. हे तीक्ष्ण मूळ पोटदुखी आणि मळमळ कमी करण्याच्या क्षमतेसाठी ओळखले जाते.

अभ्यासातून असे दिसून आले आहे की याच्या वाष्पशील तेलामध्ये बरेच गुणधर्म आहेत, ज्यामुळे सर्दी आणि फ्लू, डोकेदुखी आणि मासिक पाळीच्या वेदनांची लक्षणे कमी होण्यास मदत होते.



प्रदूषणाची ऍलर्जी असलेल्या लोकांसाठी आलं हे वरदानच आहे. आले शरीरातील म्युकस साफ करण्यास मदत करते.


हे पचनास देखील मदत करते, कोलायटिस प्रतिबंधित करते, कोणतीही जळजळ झाल्यास आपल्या पोटाला आराम देते आणि पोटातील इतर जठरासंबंधी समस्या टाळते. हे विशेषत: हिवाळ्यात आपले शरीर उबदार ठेवण्यासाठी देखील ओळखले जाते.


तुम्ही तुमच्या चहामध्ये, पदार्थांमध्ये आणि शक्य असेल तिथे जास्त आले घालायला हवे.


अश्या वेळेला अतिशय सोप्पी आणि उपयोगी सवय म्हणजे आलेवाडी नेहमी सोबत ठेवणे.


सप्रेंची आलेवाडी हि कोणत्याही प्रकारचे अर्क / फ्लेवर्स न वापरता घरगुती पद्धतीने तयार केली जाते.


सर्वात आधी आले नीट साफ केल्यावर त्याची बारीक पेस्ट बनवून साखरेच्या पाकात घालून मंद आचेवर ढवळत शिजवून घेतले जाते. नंतर थंड होण्यासाठी ट्रे मध्ये ओतून त्याच्या वड्या बनविल्या जातात.



हल्लीच्या प्रदूषित वातावरणात बहुतेक लोकांना सर्दी ,खोकला तसेच घश्याचे आजार उद्भवतात. अश्या वेळेला आलेवडी चा एक तुकडा सतत चघळत राहिल्याने घशाला बऱ्यापैकी अराम मिळतो.


सप्रेंची आलेवाडी ऑनलाईन ऑर्डर करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा आणि १०% सवलत मिळवा.


आलेवाडी  सहित अन्य उबदार खाद्यपदार्थांवर १०% सवलत मिळवा.

हि ऑफर आता फक्त ३१ डिसेंबर पर्यंत लागू. त्वरा करा.


आजच सप्रे वेबसाईट ला भेट द्या - www.saprefoods.com 

Login

forgot your password?

OR