तीळ चिक्की  ही एक पारंपारिक भारतीय मिठाई आहे जी हिवाळ्याच्या हंगामात खायला मिळते .


हिवाळ्याचे आगमन झालेले आहे! ह्या हंगामाविषयी असे काहीतरी विशेष नक्की आहे ज्यामुळे आपल्याला चमचमीत आणि तसेच गोडाचे पदार्थ खाण्याची इच्छा होते. आणि जर तुम्हाला भारतीय खाद्यपदार्थांची थोडीशी माहिती असेल, तर तुम्हाला हिवाळ्यातील अनेक पौष्टिक पदार्थ माहित असतील जे ह्या हंगामात आपल्या स्वयंपाकघरात नेहमीच आढळतात.


या थंडीच्या वातावरणात आपल्या भोजनाचा अत्यावश्यक भाग बनलेले अनेक हंगामी घटक असतात. गाजर आणि बीटरूट सारख्या भाज्यांपासून ते नट आणि ड्राय फ्रूट्स जसे की खजूर, काजू आणि बरेच काही, हिवाळ्यात अश्या सर्व खाद्यपदार्थांची रेलचेल असते. यातीलच एक घटक म्हणजे नटी आणि गोड - तीळ.


तीळ हा बहुतेक स्वयंपाकासाठी वापरला जाणारा एक लोकप्रिय घटक आहे जो वेगवेगळ्या रंगांमध्ये येतो - काळा, पांढरा आणि तपकिरी, आणि तीळ तेल काढण्यासाठी देखील वापरला जातो.


तिळाचा एक अतिशय वेगळा स्वाद असतो जो तेलाने मिळवला जातो आणि ताज्या सॅलड्स आणि विविध अनेक पदार्थ तयार करण्यासाठी वापरला जातो. पण तिळापासून बनवलेला सर्वात सामान्य पारंपारिक भारतीय पदार्थ म्हणजे स्वादिष्ट गूळ आणि तीळ ची चिक्की.


तीळ हे नैसर्गिकरित्या उबदार असतात आणि त्याचे बरेच आरोग्यदायी फायदे आहेत, ज्यामुळे ते हिवाळ्यात शरीर उबदार ठेवण्यासाठी खाणे गरजेचे आहे.


प्रथिनांनी समृद्ध शाकाहारी स्रोत असण्याव्यतिरिक्त , तीळ हे कॅल्शियम , लोह आणि अँटिऑक्सिडंट्सने भरलेले असतात . ते चांगल्या फॅट्सने देखील समृद्ध आहेत - मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड आणि ओलेइक ऍसिड - जे उच्च कोलेस्ट्रॉलला आळा घालण्यास मदत करतात आणि हृदयाच्या आरोग्यास प्रोत्साहन देतात .


सप्रे ह्यांची तीळ चिक्की  हि शुद्ध पद्धतीने तयार केली जाते . उत्तम दर्जाचे तीळ भाजून घेतले जातात आणि मग ते वितळलेल्या गूळात एकत्र केले जातात . नंतर तयार मिश्रण लाकडी फळीवर पसरवून त्याच्या वड्या बनविल्या जातात .


दाररोज तीळ चिक्की  खाल्ल्याचे बरेच फायदे आहेत .


1. तीळ आणि गुळाचे सेवन हिवाळ्यात शरीराला उबदार ठेवण्यास आणि अनेक संसर्गापासून बचाव करण्यास मदत करते.


2. तीळ आणि गूळ हे पचनासाठी उत्तम अन्न आहेत कारण त्यामध्ये भरपूर फायबर असते जे नियमित मलविसर्जन करण्यास मदत करते आणि बद्धकोष्ठता टाळते.


3. गूळ आणि तीळ हे ऊर्जा पातळी वाढवून दिवसभर पुरेशी ऊर्जा प्रदान करण्यास मदत करतात, कारण हे दोन्ही चांगल्या फॅट्स समृद्ध असतात. व्यायामापूर्वी किंवा नंतर थोड्या प्रमाणात तीळ चिक्कीचे सेवन केल्याने ऊर्जा पातळी वाढण्यास मदत होते.


4. तीळ आणि गुळामध्ये जास्त प्रमाणात अँटी-इंफ्लामेंटोरी द्रव्य असते ज्यामुळे अनेक आजारांपासून बचाव होतो.


5. तीळ आणि गूळ त्वचेसाठी चांगले आहेत, जे तुम्हाला पुरेसे पोषण देऊन, हिवाळ्यात कोरडी आणि निस्तेज त्वचा बरे करण्यास मदत करते.


खायला अतिशय कुडकुडीत आणि चवीला उत्तम अशी ही चिक्की लहान मुलांना डब्ब्यात खाऊ म्हणून तसेच प्रौढ किंवा वयस्कर ह्यांना मधल्या वेळेत एनर्जी बार म्हणून उत्तम ठरते.


ऑर्डर करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा – www.saprefoods.com



Login

forgot your password?

OR