मेथी लाडू - जरी लागला थोडा कडू, तरी असे बहुगुणी...

मेथी हा आपल्या स्वयंपाक घरातील एक अत्यंत गुणकारी असा घटक.त्याच्या कडू चवीमुळे मेथीचा आपण रोजच्या स्वयंपाकात समावेश करत नाही,परंतु आपण जर मेथीला काही ठराविक जिन्नसांसोबत मिक्स केला तर आपण त्याचा पुरेपूर उपभोग घेऊ शकतो.

सप्रे येथे मेथी लाडू  बनवताना उत्तम दर्जाचे मेथी दाणे दळून त्यात गहू पीठ, खसखस , सुके खोबरे व साखर घालून हे लाडू वळले जातात.

मेथीचे नियमित सेवन रक्तातील कोलेस्टेरॉल कमी करून हृदयाच्या विकारांचा धोका टाळण्यास उपयोगी ठरते, तसेच मधुमेहाचा आजार असलेल्या लोकांनी त्यांच्या आहारातून मेथीचे सेवन केल्यास रक्तातील साखरेची पातळी योग्य प्रमाणात राहण्यास मदत होते.

स्त्रियांच्या आरोग्यासाठी मेथी हे वरदानच आहे . मेथीच्या नियमित सेवनाने कमरेचे स्नायू बळकट होतात, मासिकपाळीचा त्रास कमी होतो. प्रसूती सुसह्य होते. आपल्याकडे पूर्वीपासून बाळंतीण स्त्रियांना मेथीचे लाडू खायला देतात. स्तनपान करणाऱ्या मातांमध्ये दुधाचे प्रमाण वाढण्यास मेथी लाडू एकदम उपयोगी आहे. केसांच्या आणि त्वचेच्या उत्तम आरोग्यासाठी देखील मेथी अतिशय उपयुक्त आहे. अशी हि बहू गुणकारी मेथी आणि मेथी लाडू यांचे नियमित सेवन करणे गरजेचे आहे.

असे हे बहुगुणी मेथी लाडू घरबसल्या ऑर्डर करा आणि आरोग्याची काळजी घ्या.

ऑर्डर करण्यासाठी लिंक वर क्लिक करा.

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Fenugreek Laddu / Methi ke Laddu

Even if it feels a little bitter, but it is a treasure of goodness...

Fenugreek is a very beneficial ingredient in our kitchen. Due to its bitter taste, we do not include fenugreek in our daily cooking, but if we mix fenugreek with certain ingredients, we can enjoy it to the fullest.

While making fenugreek laddu at Sapre, these laddu are turned by grinding high quality fenugreek seeds and adding wheat flour, poppy seeds, dried coconut and sugar. Regular consumption of fenugreek helps in lowering blood cholesterol and preventing the risk of heart disease, and also helps people with diabetes to keep their blood sugar levels in the right range if they consume fenugreek in their diet.

Fenugreek is a boon for women's health. Regular consumption of fenugreek strengthens the lumbar muscles and reduces menstrual cramps. Delivery becomes tolerable. Since ages, these fenugreek laddus are given to pregnant women to survive pregnancy easily. Fenugreek laddu is very useful in increasing the milk supply in breastfeeding mothers. Fenugreek is also very useful for good health of hair and skin. It is necessary to consume such multi-beneficial fenugreek and fenugreek laddu regularly.

Try these healthy and very nutritious methi/fenugreek laddu at home by clicking here.

Login

forgot your password?

OR